लाडकी बहीण योजनेतून 9 लाख महिला झाल्या अपात्र ; पहा यादीत नाव

आपण आज एक महत्वाची गोष्ट पाहणार आहोत. राज्यात “लाडकी बहीण योजना” चालू आहे. या योजनेतून काही महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात. पण आता एक मोठी बातमी आली आहे. जवळपास ९ लाख महिलांचे अर्ज सरकारने बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणाचे अर्ज रद्द होणार?

सरकारने सांगितले आहे की अनेक महिलांचे अर्ज आता तपासले जात आहेत. ही तपासणी अजून चालू आहे. तपासणी संपल्यावर, ज्यांच्या कागदपत्रात काही चुकीचे आढळेल किंवा योजना मिळवण्यासाठी नियम पूर्ण करत नाहीत, त्यांचे अर्ज बाद होतील.

अर्ज कशामुळे होणार बाद?

  • काही महिलांकडे चारचाकी गाडी आहे. या महिलांचे अर्ज रद्द होतील.
  • काही महिला महाराष्ट्राच्या बाहेर राहतात, पण त्यांनी खोटे कागदपत्र दिले. त्यांचेही अर्ज बाद होतील.
  • ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, अशा महिलांनाही योजना मिळणार नाही.

लाडकी बहिणींची काळजी वाढली

या बातमीमुळे अनेक महिलांना टेन्शन आले आहे. काहींना मागच्या दोन महिन्यांपासून पैसेही आले नाहीत. हे सर्व अर्ज आधीच रद्द झाले आहेत. सरकार आता उरलेल्या अर्जांचीही तपासणी करत आहे. त्यामुळे तुमचा अर्ज यादीत आहे का हे तपासा.

अर्ज तपासणी कशी होते?

सरकार अर्जांची ५ टप्प्यांमध्ये तपासणी करत आहे. यात घरचं उत्पन्न, वाहन, आणि तुमचे कागदपत्र तपासले जात आहेत. अजून काही दिवसात ही तपासणी पूर्ण होईल.

महत्वाची सूचना

जर तुमच्याकडे Ration Card आहे, तर KYCS पुरावा द्या. नाहीतर तुमचं रेशन कार्डही रद्द होऊ शकतं. सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे.

Leave a Comment