याच महिलांना मिळणार 3 मोफत सिलिंडर ; असा करा अर्ज

राज्यातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. आता महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. ही योजना Annapurna Yojana या नावाने जाहीर करण्यात आली असून, याचा फायदा लाखो महिलांना होणार आहे.


योजनेची घोषणा कुणी केली?

राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केल्यानंतर आता ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ सुद्धा लागू केली आहे. या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात केली होती.


योजनेत काय मिळणार आहे?

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर (14.2 किलो वजनाचे) दिले जातील. गॅस सिलेंडरची किंमत आधी महिलांनी भरायची आहे, त्यानंतर ती रक्कम बँक खात्यात परत जमा केली जाईल.


Annapurna Yojana ला पात्र कोण?

योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणं आवश्यक आहे:

  • गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असावं.
  • महिलेला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत गॅस कनेक्शन मिळालं असावं.
  • माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
  • एका कुटुंबातून एकच सदस्य (रेशन कार्डनुसार) या योजनेस पात्र असेल.

काय कागदपत्र लागतील?

यासाठी कोणताही नवीन अर्ज करण्याची गरज नाही. आधीच जे महिलांनी उज्ज्वला योजना आणि लाडकी बहीण योजनेत नोंदणी केली आहे, त्यांची माहिती सरकारने समितीमार्फत तेल कंपन्यांना पाठवणार आहे.


अर्ज कसा करायचा? Online की Offline?

या योजनेसाठी नवा अर्ज करायची गरज नाही. तुमचे नाव जर आधीच्या योजनांमध्ये असेल, तर तुम्ही आपोआप पात्र ठरता.


योजनेची कार्यपद्धती कशी असेल?

  1. महिलांनी आधी गॅस सिलेंडर विकत घ्यावा.
  2. नंतर राज्य सरकारकडून प्रति सिलेंडर 530 रुपये थेट बँक खात्यावर पाठवले जातील.
  3. वर्षभरात फक्त 3 सिलेंडरवरच ही सबसिडी मिळेल.
  4. एका महिन्यात जास्त सिलेंडर घेतल्यास सबसिडी मिळणार नाही.

महत्वाचे नियम आणि अटी

  • लाभ फक्त 14.2 किलो सिलेंडर असणाऱ्या गॅस ग्राहकांनाच मिळेल.
  • वर्षात फक्त 3 सिलेंडरचं अनुदान मिळेल.
  • लाभार्थ्यांची यादी तेल कंपन्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.
  • जिल्हानिहाय समित्या लाभार्थ्यांची अंतिम यादी ठरवतील.

लाभार्थींची यादी कशी ठरेल?

राज्य सरकारने समित्या नेमल्या असून, त्या समित्या खालील गोष्टी निश्चित करतील:

  • लाभार्थ्यांचं रेशन कार्डनुसार कुटुंब ठरवणं.
  • सर्व अटी पूर्ण करणाऱ्या महिलांची आधार आणि बँक खात्यांसह अंतिम यादी तयार करणं.
  • ही यादी तेल कंपन्यांना पाठवली जाईल.

महिलांसाठी सरकारचं पुढचं पाऊल

या योजनेमुळे महिलांना आर्थिक सवलत मिळेल आणि घरगुती खर्चात मदत होईल. लाडकी बहीण योजना आणि अन्नपूर्णा योजना एकत्रितपणे महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्याचं काम करत आहेत.


जर तुमचं नाव उज्ज्वला किंवा लाडकी बहीण योजनेत आहे, तर तुम्ही कोणताही फॉर्म भरत नसतानाही अनुदानित 3 गॅस सिलेंडर मिळवू शकता. तुमचं गॅस कनेक्शन जर तुमच्या नावाने असेल, तर तुम्हाला हा लाभ नक्की मिळू शकतो.

Leave a Comment