लाडकी बहीण योजनेतून या महिला होणार अपात्र; चेक करा यादीत नाव

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. ही योजना खास करून गरजूं महिलांसाठी आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनेक महिलांनी अर्ज केले आहेत. आजपर्यंत २ कोटी ४७ लाख महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरवले गेले आहे.

योजनेचा मुख्य उद्देश काय?

या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, गरीब कुटुंबातील महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये मदत मिळावी. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. सरकारला ही रक्कम देण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. प्रत्येक महिन्याला सुमारे ३,८७० कोटी रुपये खर्च येतो. हे पैसे वर्षभर दिले गेले, तर ६५,००० कोटी रुपयांपर्यंत खर्च होऊ शकतो. त्यामुळे सरकारकडून हा खर्च नीट पाहून केला जातो.

कोणत्या महिलांना लाभ मिळतो?

या योजनेसाठी काही नियम आहेत. जे महिलांनी पाळणे आवश्यक आहे. हे नियम असे आहेत:

  1. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.
  2. कुटुंबाजवळ चारचाकी गाडी नसावी.
  3. महिला किंवा तिच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नसावे.
  4. एका कुटुंबातून फक्त दोन महिलांनीच अर्ज करावा.
  5. कुटुंबाकडे २ हेक्टरपेक्षा जास्त शेती नसावी.
  6. अर्ज करताना आधार कार्ड आणि बँक खाती योग्यरित्या जोडलेली असावी.

अर्जात काही चुका झाल्या तर काय?

काही महिलांनी अर्ज केले आहेत, पण त्यांच्या अर्जात काही माहिती चुकीची आहे. त्यामुळे सरकार त्या अर्जांची पुन्हा तपासणी करत आहे. जर कोणत्याही महिलेने अटी पाळल्या नाहीत, तर तिचा पुढचा हप्ता थांबवला जाईल.

आतापर्यंत किती पैसे मिळाले?

या योजनेअंतर्गत सहा हप्त्यांमध्ये प्रत्येकी ९,००० रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा करण्यात आला आहे. एकदा महिलेला लाभ मिळाला की तो परत घेण्यात येणार नाही, असे सरकारने स्पष्ट सांगितले आहे.

महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ज्या महिलांनी सर्व नियम पूर्ण केले आहेत, त्यांना योजना सुरूच राहील. योजनेच्या अटींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Leave a Comment